शेगावात फिटनेस क्लब जिमचे उद्घाटन

शेगाव प्रतिनिधी । शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून फिटनेस क्लब जिमचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील युवक व युवतींच्या आरोग्याच्या दृष्टीने जिममध्ये व्यायामासाठी जेराई कंपनीचे साहित्य प्रथमच शेगावात लावण्यात आल्याने याचा लाभ शहरातील व ग्रामीण परिसरातील महिला व पुरुषांना व तरुणाईला घेण्याची आता सोय झाली आहे.

यावेळी प्रमुख म्हणून काँग्रेसचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, विक्रांत पाटील, श्रद्धा पाटील, राकेश पन्नासे, गजानन बुरुंगले, पैलवान विजय बुच यांच्यासह मान्यवर यावेळी हजर होते. जिमच्या माध्यमातून तरुणाई सशक्त तयार होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित फिरोज खान, पत्रकार नाना पाटील, महेंद्र मिश्रा, समीर देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सर्व सुविधा युक्त तसेच अत्याधुनिक कल्पकतेच्या माध्यमातुन हवेशीर तसेच वातानुकलीत  वातावरण उपलब्ध करुन देण्यात आले असून नव युवक व युवतीकरींता विेशेष प्रशिक्षकांचे मार्गदर्शन राहणार आहे.  तसेच  युवक युवतीकरीता चेंगिज रुम, मजास सेंटर, स्टिम बाथ, आदी सुविधा नाविन्यपुर्ण कल्पकतेच्या माध्यमातुन शेगांवकरांकरीता  उपलब्ध करुन देण्यात आल्या अ ाहेत. शेगांवातील युवक युवतीकरीता आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच संजवीनी ठरणार आहे.

Protected Content