दिवाळी खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत नागरीकांची गर्दी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळी निमित्त खरेदी करण्यासाठी रविवारी २३ ऑक्टोबर रोजी शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी झाली. खरेदीसाठी आलेल्या नागरीकांना त्यांची वाहने लावण्यासाठी अपुरी जागा असल्याने मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.

 

कोरोनामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दिवाळी सण साजरे करण्यास प्रतिबंध लावण्यात आले होते. नवीन कपडे, फराळ, सजावटीचे साहित्य, आकाशदिवे, सोन्या – चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शनिवार २२ ऑक्टोबरपासून सकाळपासूनच नागरीकांची गर्दी झाली होती. रविवारी २३ ऑक्टोबर रोजी देखील मुख्य बाजारपेठेत वाहतूकीचे योग्य नियोजन लावण्यात न आल्याने वाहतूक कोंडी झाली. यात महात्मा फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, नेताजी सुभाष चौक, बोहरा गल्ली, सराफ गल्ली, दाणा बाजार परिसरात नागरीकांची दिवाळी वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरातून वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे नागरीकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, त्यात पार्कींगची व्यवस्था नसणे आणि वाहनधारकांनी मुख्य रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे ये – जा करणार्‍या इतर वाहनधारकांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. जळगाव महापालिका, शहर वाहतूक शाखेने याकडे लक्ष देऊन वाहतूकीची कोंडी सोडवावी अशी मागणी होत आहे.

Protected Content