नाहाटा महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्राहक दिन” उत्साहात

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज (दि.२४ डिसेंबर) रोजी ” राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई. भंगाळे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एस. नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ .व्ही .एन महिरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ममताबेन पाटील आणि प्रा. भूपेंद्र बानाईत उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एस.नाडेकर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन आणि ग्राहक सरंक्षण कायद्याचे महत्व सांगितले. सन १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा, यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते हे देखील त्यांनी नमूद केले. सध्याच्या युगात ऑनलाईन खरेदीमुळे ग्राहकांची फसवणूक होत असते, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीस ग्राहक सरंक्षण कायद्याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे.

या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आलेले असल्याची माहिती उपप्राचार्य. प्रा. डॉ. भंगाळे यांनी दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कांचन पाटील यांनी केले आणि नेहा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रासेयोचे स्वयंसेवक एकता बजाज, गायत्री बजाज, वैष्णवी ठाकूर, संजना दुधानी, कल्याणी पराळे ,जयश्री पाटील, आदित्य हिवरे, स्वप्निल डोळसे,विक्रांत रोडे, खुशाल मानकर, आकांशा चांदेकर, तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, हर्षल चव्हाण, गोपाळ रंदाळे, चेतना पाटील, निकिता बोरसे, अमोल सुरडकर आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, डॉ.बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

 

Protected Content