भुसावळ येथील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात शेतकरी दिन उत्साहात

भुसावल, प्रतिनिधि | येथील पु.ओ. नाहाटा महाविद्यालय नियोजन अभ्यास मंडल यांच्या संयुक्त विदमाने राष्ट्रीय शेतकरी दिन उपप्राचार्य व सामाजिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. डी .गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

भुसावळ येथील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय शेतकरी दिवस उपप्राचार्य व सामाजिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. डी .गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. एस. टी. धुम तसेच भुसावल परिसरातील प्रगतिशील शेतकरी अनिल महाजन ( खडका ) उमाकांत भारंबे ( साकरी ) लखन पाटील ( किन्ही ) शाम पाटील ( पारोळा ) आदी शेतकरी उपस्थित होते . प्रा. एस. टी. धुम यांनी भारतीय शेती क्षेत्रातील परिणाम व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगीतले की, ए. ओ. ए ची निर्मिती कशी झाली. त्यातील तरतुदी ग्रीनबॉक्स, ब्लू बॉक्स, अंबर बॉक्स , इत्यादी विषय माहिती दिली . भारतीय अर्थव्यवस्था अनुकूल परिणामापेक्षा प्रतिकूल परिणाम जास्त झाले आहे. त्यामुळे भारतीय शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होत आहे .नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठातील शेती भावातील चढ -उतार या समस्यान बरोबर भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत . देशांतर्गत पातळी वरील उपाययोजना करुन जागतीक पातळी वर विचार निनिमय करून शेतकर्याचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान अनिल महाजन (खडका ) यानी मार्गदर्शन करतांना म्हणाले आमच्या परिवारात माझे वडील व मी शेती व्यवसाय करत आहे .मात्र आताची पिढी ही शेती करेल च याची शाश्वती नाही .याला जबाबदार आपली पध्दत आहे . त्यात बदल होणे अपेक्षित आहे .अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली . उमाकांत भारंबे ( साकरी ) यानी अपने मनोगत व्यक्त केले. त्यात ते म्हणाले शासनाचा आणि कृषि अधिकारी यांच्या सल्याने सेंद्रिय शेतीचा प्रयोग झाला .मात्र सदर शेतीसाठी खर्च अधिक असल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरविली. त्यामुळे आर्थिक झळ शेतकऱ्यांना पोहचली. सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती मध्ये अमुलाग्रबदल करून सामान्य ग्राहकांन मध्ये जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच अध्यक्षक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी म्हणाले की अर्थशास्त्रचे इजेकाईल कोळ्याचा सिद्धांत उल्लेख करीत भारतीय शेतकरी देखील या चक्रव्युव हात सापडलेला आहे . या चक्रव्हवतून शेतकऱ्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाला ताप्ती एज्युकेशन सोसाइटी चे अध्यक्ष डॉ मोहनभाऊ फालक , प्राचार्य डॉ.सौ . एम . व्ही. वायकोळे हे कामात व्यस्त असल्याने कार्यक्रमात सहभागी होवू शकले नाही. परंतु त्यांनी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित कार्यक्रम व शेतकारी बांधवाना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. ललीत तायडे यांनी केले . उपप्राचार्य डॉ . एस. व्ही.पाटील, डॉ . बी . एच . ब -हाटे , डॉ. एन. ई . भंगाळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा व्ही. ए . सोळुखे, डॉ . किरण वारके, प्रा जे.पी . आडोकार, प्रा. शितल सोनवणे, यांनी परिश्रम घेतले . मराठी विभाग प्रमुख डॉ .के . के . अहिरे ,डॉ . जे . एफ. पाटिल, इंग्रजी विभागातील प्रा. डॉ . स्मिता चौधरी, हिंदी विभाग प्रमुख डॉ.मनोज पाटिल. इतिहास विभाग प्रमुख डॉ . पी . एच . इंगोले , डॉ . एन . एन . झोपे,डॉ राजेंद्र तायडे, यासह प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content