पकड वॉरंटमधील एकाला भुसावळातून अटक

bhusawal news 7

भुसावळ प्रतिनिधी । न्यायालयाच्या आदेशानुसार पाहिजे असलेला आरोपीला भुसाळातून अटक करण्यात आली असून त्याला पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जामनेर न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी संहिता नं.121/2018 नुसार पाहिजे असलेला संशयित आरोपी अशोक नारायण राजपूत वय-38 रा. आरएमएस कॉलनी, शिवपूर कन्हाळा रोड भुसावळ याला अप्सरा चौकातून अटक करण्यात आली. याकामी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. चंद्रकांत बोदडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे यांनी काम पाहिले. पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content