भडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८ मार्चपासुन लसीकरणास शुभारंभ

भडगाव प्रतिनिधी । भारतात कोविड-१९ लसीकरण सुरुही झालेले आहे. भारतात दोन प्रकारच्या लसी दिल्या जात आहे. त्याअनुषंगाने भडगाव येथील ग्रामिण रुग्णालयात लसीकरण सुरुही झालेले आहे. आता भडगाव तालुक्यातील कजगाव, गुढे, पिंपरखेड व गिरड ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८ मार्च पासुन लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. 

लसीकरण शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात येत आहे. अशी माहीती भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.  सुचिता आकडे यांनी दिली. कोव्हीड-१९ चे लसीकरण करण्या संदर्भात आरोग्य विभागाची भडगाव येथे पचायत समिती सभागृहात मध्ये मिटिंग पार पडली. याबाबतीत अधिक माहीती देतांना कजगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.  प्रशांत पाटील यांनी सांगितले की, ग्रामिण भागात लसीकरणास प्रारंभ होत आहे. त्यांत ४५ ते ५९ वयोगटातील कोमाँरबिड व ६० वर्षावरील व्यक्तिंसाठी लसीकरण केले जाणार आहे. भारतात दिल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या सिरमची कोव्हीड शिल्ड व भारत बायोटेकची कोव्हँक्सिन ह्या दोन्ही पुर्णपणे सुरक्षित असुन नागरिकांनी लस टोचुन घ्यावी. असे आवाहन केले आहे. 

लस घेण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच लस घेतांना पोटभर जेवण करणे गरजेचे आहे. सदर मिटिंग प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील,  डॉ. प्रतिक भोसले, डॉ. नितिन सोनवणे, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ.  अभिजित पाटील, डॉ. नरेद्र पाटील, डॉ. कुलदिप पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पाटील सह सर्व आरोग्यसहाय्यक, आरोग्यसहाय्यिका, आरोग्य सेवक व गटप्रवर्तक उपस्थित होते.

 

Protected Content