संगणकाचा वापर मुल्याधिष्टीत व्हावा : डॉ.मिलिंद बिल्दीकर

3531d111 2dee 4e8b ab53 b3e23f618a58

चाळीसगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेटचे ज्ञान मिळावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आमच्या महाविद्यालयातील संगणक विभाग गेल्या ११ वर्ष पासून आय टी दिंडीचे आयोजन करीत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात माहिती संकलनासाठी विविध उपकरणे वापरत असताना योग्य ती खबरदारी घेऊन संगणकाचा वापर मुल्याधिष्टीत व्हावा असे अनेक उपक्रम आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवित असतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी संगणक साक्षरता (आय टी दिंडी ) प्रसंगी केले.

बी पी आर्टस् एस एम ए सायन्स के के सी कॉमर्स कॉलेज चाळीसगाव यांनी चाळीसगाव तालुक्यातील आश्रम शाळां मध्ये जाऊन त्याठिकाणी संगणक साक्षरता (आय टी दिंडी ) हा उपक्रम राबविला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एम व्ही बिल्दीकर यांनी आय टी दिंडी ला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले. यावेळी प्रा आर व्ही जोशी प्रा जोशी डी डी प्रा दीपक आवटे ,प्रा लोंढे, प्रा सौ गायत्री चौधरी प्रा रवी पाटील प्रा अश्विनी शिरुडे, दिलीप शेटे धनु शेटे आदी उपस्थित होते. या दिंडीमध्ये प्रा. नलिनी चौधरी ,प्रा. रश्मी साळुंखे ,प्रा.अश्विनी पाटील यांच्यासोबत टीवायएस्सीचे विद्यार्थी प्रांजली चव्हाण , महेश महेंदळेकर उपस्थित होते. सदर दिंडी ही आश्रम शाळा खडकी आणि देवळी ,मेहुणबारे आणि डेराबर्डी (चाळीसगाव ) या शाळांमध्ये जाऊन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करून आधुनिक युगात संगणक शिकण्यासोबतच ते योग्य रीतीने वापरण्या संदर्भात आपल्या सादरीकरणातुन माहिती दीली. याप्रसंगी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन संगणकविषयी माहिती जाणून घेतली.

Add Comment

Protected Content