पाडळसरे धरणासाठी १ मार्चपासून बहुजन क्रांतीतर्फे जेलभरो आंदोलन

c5812146 1c88 4753 adfc 62813ad912a0

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरण जनआंदोलनाची दखल घेऊन शासनाने धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, म्हणून विविध संघटना स्वतंत्रपणे पुढे सरसावल्या असून धरणासाठी पेटलेले आंदोलन शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाडळसे धरण जनआंदोलन समितीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना धरणाचा समावेश दुष्काळ व्यवस्थापन अथवा नाबार्डमध्ये करण्याच्या मागणीचे पत्र पाठवले आहे. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटिल यांनी सध्याच्या सरकारमधील लोकप्रतिनिधीच्या काळात ८६ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचे निवेदन जनआंदोलन समिती समोर सादर केले.

या साखळी उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेकडो हमाल मापाडी यांनी मार्केटचे कामकाज बंद पाडले. ‘पाडळसे धरण पूर्ण झालेच पाहिजे’ अश्या घोषणा देत आंदोलनस्थळी येऊन आंदोलनात सहभागी नोंदवला. सध्या धरण प्रश्नावर वातावरण तापत चालले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनास पाठींबा देतांना ‘१ मार्च ला जेलभरो आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे रणजित शिंदे, प्रा.शिवाजीराव पाटील, राजेश मोरे, विजय गाडे, संदीप सैंदाणे, दिनेश बिऱ्हाडे आदिंनी उपोषण स्थळी जाहीर केले. तर आंदोलनास पाठिंबा देणारे वेगवेगळ्या युवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे रास्ता रोको आंदोलन करण्याचेही जाहीर केले आहे.

निम्न तापी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा, धुळे या सहा तालुक्यांसाठी संजिवनी असलेल्या पाडळसे प्रकल्पाचा समावेश दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रम अथवा नाबार्डमध्ये करणेबाबतचे पत्र सुभाष चौधरी व प्रा.एस.ए.पाटील यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. याशिवाय सामाजिक पातळीवरही समाजसमूहांनी धरण पूर्ती च्या प्रश्नावर आंदोलनात उडी घेतली आहे. अमळनेरातील माळी समाजाने अखिल भारतीय महात्मा फ़ुले समता परिषदच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनात गंगाराम निंबा महाजन, मनोहर महाजन, किशोर माळी, गुलाबराव माळी, नगरसेवक भाऊसाहेब महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन, अॅड.सुदाम महाजन, अबू महाजन, भिमराव महाजन, अमळनेर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष फैय्याज खां वाहब खा, इकबाल मिस्त्री, नगरसेवक सलिम टोपी, नगरसेवक शेख हाजी साहब, मा.नगरसेवक फिरोज पठाण, जाकीर हुसेन, अ. सत्तार रमजान, रफिक मिस्त्री, अ. सत्तार रज्जाक, अखलाक भाई, फारुख भाई, अफरोज भाई आदी उपोषणात सहभागी झाले होते. तालुका सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटिल,तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटिल,सरचिटणीस प्रा.सुनिल पाटिल, नरेंद्र पाटिल सबगव्हान,गलवाडे खु चे डी. एस.पाटिल, कावपिंप्रीचे दिनेश पाटिल,झाडी चे भुपेंद्र पाटिल, कंडारीसाज, रामकृष्ण पाटिल,गलवाडेचे सुनिल पवार आदी सरपंच सहभागी झालेत. तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद अंतर्गत पंचायत राज विकास मंच तर्फेही अध्यक्षा सौ.उज्वला बाई महेश पाटिल,सुरेश अर्जुन पाटिल,उपाध्यक्षा कोकीळाबाई गोसावी,अनिल शिसोदे, रामकृष्ण पाटिल,किशोर सूर्यवंशी, अशोक पाटिल, जोत्सना लोहार,राजेंद्र पाटिल, अड.अमोल ब्रह्मे,नरेंद्र पाटील आदींनी प्रत्यक्ष उपस्थिती देत पाठिंबा दिला आहे.

चोपडा तालुक्यातून पाठींबा – जळगांवचे माजी महापौर किशोर पाटील, सौ.माधुरी पाटील, यांचेसह वेले चोपडा येथील संदीप पाटील, गलवाडे चोपडा सरपंच किशोर बोरसे व शेतकरी बांधव, गोडवेलचे चंद्रकांत पाटील,धुपे येथील जगदिश पाटिल, तालुका उपसा सिंचन समितीचे सचिव रमेश बोढरे, नंदाबाई चौधरी, वैशाली चौधरी, भूमिका चौधरी, मनिषा पंकज चौधरी आदिंसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती नंदकिशोर व्यंकट पाटील, पत्रकार बाळकृष्ण पाटील, निमझरी मा.सरपंच मधुकर पाटील यांचेसह इदापिंप्री, कलाली, लोंढवे, दहिवद, सोनखेडी, नंदगाव, डांगरी, बोरगाव, अमळगाव, लोण, भरवस, मंगरूळ येथील ग्रामस्थ यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे जिल्हासचिव कॉ. ज्ञानेश्वर पाटील व नरेन्द्र पाटील यांनीही पाठींबा दिला आहे.

Add Comment

Protected Content