राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे राज्यभर धरणे आंदोलन

jalgaon 2

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. 3 ऑगस्ट शनिवार रोजी संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांच्या हक्क तसेच अधिका-यांसाठी 25 मागण्यांबाबत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे त्यांच्याशी चर्चा करून राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचेसह गणेश काकडे, संजय सोनार, विक्रम सोनवणे, यशराज निकम, अनिल भिरुड पाच जणांच्या शिष्टमंडळाने जाऊन संध्याकाळी 5 वाजता निवेदन देण्यात आले. हे निवेदन तातडीने शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समितीचे समन्वयक व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील, कुंझरकर यांनी सर्व प्रश्‍नांच्या संदर्भात पाठिंबा देत सर्व राज्यस्तरीय प्रलंबित प्रश्न जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शासनापर्यंत मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या राज्यस्तरीय धरणे आंदोलनाच्या निमंत्रणावरून भेट देत त्यांनी आपली भूमिका व मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे. तसेच या मागण्यांच्या संदर्भात सदैव सोबत असल्याचे ही ते म्हणाले आहे.

धरणे आंदोलनाचे सर्व नियोजन आनंद जाधव केले असून तायडे सरांनी सर्व सहकार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यावर आजचे धरणे आंदोलन यशस्वी संपन्न झाले. जळगाव जिल्ह्यात राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी जुनी पेन्शन हक्क योजनेपासून प्रलंबित सर्व प्रश्‍नांच्या संदर्भात बिनशर्त पाठिंबा देऊन सहभाग नोंदवून प्रोत्साहन दिल्याबद्दल विक्रम सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. तसेच राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे नेतृत्व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे अभ्यासू, नेतृत्व राज्य शासनाचे आदर्श शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर हे करीत असल्याने जळगाव जिल्ह्याला त्याचा सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले आहे.

यावेळी विक्रम सोनवणे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रतापसिंग परदेशी, शिक्षक सेनेचे गजानन नीळ, प्रोटान संघटनेचे जिल्हा प्रभारी गणेश काकडे, यशराज निकम, किसन सूर्यवंशी, संजय सोनार, राज्य संघटक, जुनी पेन्शन हक्क समिती अनिल भिरुड, विक्रम सोनवणे, विशाल महाजन व मा.बापू बहारे बामसेफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वात शेवटी जे.ए.चौधरी यांनी आभार मानले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी विकास संघ तसेच प्रोट्रॉनच्या तालुका जिल्हा सर्व कार्यकारिणी सदस्यांनी व सभासदांनी परिश्रम घेतले आहे.

Protected Content