जळगाव (प्रतिनिधी) राज्यात भाजपाचे शासन असून जळगाव मनपात त्यांच्याच भाजपाची सत्ता असल्याचा विसर पडला का? असे शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी म्हणताच भाजप सदस्य आक्रमक झाले. परंतू त्यानंतर सेनेचे उपगटनेते प्रशांत नाईक यांनी तर हाता माईक घेवून ‘शासन तुला मनपावर भरवसा नाय का?, असे गाणे सुरु केले. त्यापाठोपाठ सेना सदस्यांनी त्यांना साथ देत भाजपाची खिल्ली उडवली. नगरोथ्थान योजनेतून महापालिकेस मंजूर करण्यात आलेल्या ४२ कोटी रुपयांची कामे सार्वजनिक विभागाकडून करण्याबाबत शासनाने संबधित अद्यादेशात म्हटल्यावरून आज शनिवारी झालेल्या महासभेत शिवसेना-भाजपात चांगलीच जुंपली.
महापालिकेची महासभा आज शनिवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डा. आश्विन सोनवणे, आयुक्त डाॅ. उदय टेकाळे व नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. महासभेत शिवसेनेचे नितिन लढ्ढा यांनी महापालिकेस नगरोथ्थान मधून ७० कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री गिरिष महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र, मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मनपाचा ३० टक्के हीस्सा दिला नसल्याची माहीती त्यांनी दिली. नुकतेच या निधीपैकी ४२ कोटीच्या कामांना मान्यता देण्यात आली. यातील मनपाचा हीस्सा १२ कोटी रुपये कसे आणणार ? असा प्रश्न उपस्थित करताच भाजप सदस्यांनी त्याला विरोध करीत ही रक्कम देखील शासन देणार असल्याचे सांगीतले.
नितिन लढ्ढा यांनी शासनाने काढलेल्या अद्यादेशात ४२ कोटीची कामे सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून केली जावी असे निदर्शनास आणून दिले. राज्यात भाजपाचे शासन असून मनपात त्याच्याच भाजपाची सत्ता असल्याचा त्यांना विसर पडला का? असे लढ्ढा यांनी म्हणताच भाजप सदस्य आक्रमक झालेत. सेनेचे उपगटनेते प्रशांत नाईक यांनी हाता माईक घेवून ‘शासन तुला मनपावर भरवसा नाय का?, असे गाणे सुरु केले त्यापाठोपाठ सेना सदस्यांनी त्यांना साथ देत भाजपाची खिल्ली उडवली. यावर कैलास सोनवणे यांनी ना. महाजन व ना. गुलाबराव पाटील याबाबत पाठपुरावा करती असे सांगीतले.
महासभेच्या विषयपत्रिकेवरील १८ विषयांपैकी दोन विषय तहकूब ठेवून १६ विषय मंजूर करण्यात आले. तसेच आयत्यावेळी आलेल्या तिन विषयांना देखील मंजूरी देण्यात आली. भूसंपादनाचे विषयपत्रिकेवरील सर्व विषय जमिन मालकांना मोबदला म्हणून टीडीआरचा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेवून मंजूर करण्यात आले. विकास योजनेत दर्शविलेला वाघूर कनालची आखणी रद्द करण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. तर अॅड. सुचिता हाडा यांनी मनपाची जागा रेडक्रास सोसायटीजवळ असून त्याबाबत प्रशासनाचे लक्ष नसल्याचे सांगीतले. ती जागा ताब्यात घेण्याचा विषयाला मंजूरी देण्यात आली. तसेच अशा अनेक मनपाच्या जागा असून त्या शोधून ताब्यात घेणे व त्यातून उत्पन्न मिळविण्यासाठी एक सक्षम अधिकारी नेमण्याची सूचना त्यांनी मांडली.
ट्राफिक गार्डनची जागा जिल्हा नायालयास देण्याचा निर्णय
शहरातील मनपाच्या ताब्यात असलेली ट्राफिक गार्डनची जागा जिल्हा नायालयासाठी देण्याचा निर्णय करण्यात आला. मात्र, तेथिल कुठल्यातरी जागेस स्वातंत्र्यसेनानी मिर शुकूल्लाह यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. भंगार बाजार ९९ वर्षासाठी भाडेकरारावर देण्याचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवून त्याचा अभ्यास करुन निर्णय घेण्यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह त्रिसदस्यीय सिमिती नेमण्यात आली. यावर शिवसेनेनेच्या सूचनेवरु समितीमध्ये एक एमआयएमचा सदस्य घेण्यासही मान्यता देण्यात आली.