आता कोणत्याही शक्यतेसाठी तयार राहा – इम्रान खान

0

इस्लामाबाद (वृत्तसंस्था)। ‘आता कोणत्याही शक्यतेसाठी तयार राहा’, अशी सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि सर्वसामान्य जनतेला केली आहे. आज पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर इम्रान खान यांनी तातडीची बैठक बोलावली. त्यानंतर त्यांनी या सूचना केल्या आहेत.

या बैठकीपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईवर टीकास्त्र सोडले. भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेली ही कृती अत्यंत गंभीर असल्याचे कुरेशी म्हणाले होते. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले असून पाकिस्तानला भारताला जशास तसे उत्तर देण्याचा, तसेच आत्मसंरक्षणाचा हक्क असल्याचा उच्चारही कुरेशी यांनी केला होता. पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीपूर्वी कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयात तातडीची उच्च स्तरीय बैठक बौलावली होती. पाकिस्तानचे लष्कर भारताकडून होणाऱ्या कारवाईला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचेही कुरेशी म्हणाले होते. लवकरच आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत विशेष बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!