विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर केले जप्त

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालशीव शिवारात विना परवाना वाळूची अवैध वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरला महसुलच्या  पथकाने जप्त केले. या ट्रॅक्टरवरील चालक मात्र पसार झाला.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील महसुलचे पथक हे वाळु माफीयांच्या  मागावर बुधवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 10. 30 वाजेच्या सुमारास असताना भालशीव गावाच्या शिवारात  यावल मार्गावर ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.एन.4134)  हे विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी वाळूने  भरलेल्या बेवारस स्थितीत आढळले. यावल विभागाचे मंडळाधिकारी शेखर तडवी, यावलचे तलाठी ईश्वर कोळी,  परसाडे येथील तलाठी समीर तडवी, कोतवाल पंढरीनाथ अडकमोल व कोळवद तलाठी संदीप गोसावी व कोळवदचे  कोतवाल सोनु सिंग यांनी ट्रॅक्टर जप्त केले तर ट्रॅक्टरला कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी चालवत पोलिस  ठाण्यात जमा केले. हे ट्रॅक्टर वाहन शरद भागवत कोळी यांच्या मालकीचे असून त्यास यावल पोलिस स्टेशन मध्ये  पुढील दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात आले. या कारवाईने मात्र अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांमध्ये  धडकी भरली.

Protected Content