रोहिणी खडसे यांनी स्व:खर्चातून उपलब्ध केले ३० बेड

मुक्ताईनगर प्रतिनिधी । सध्या कोरोना महामारीमुळे मुक्ताईनगरासह तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये बेड अपुरे पडत असल्याची बाब लक्षात येताच, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी स्व:खर्चातून कुऱ्हा येथील कोविड सेंटरसाठी ३० बेड तात्काळ उपलब्ध करून दिले. तसेच अजून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. 

सध्या वाढती रुग्णसंख्या बघता मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर अपुरे पडत आहे. हि बाब लक्षात घेऊन कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले होते कोविड सेंटर साठी लागणारे साहित्य लोकसहभागातून उपलब्ध करून देण्याची तयारी सुध्दा दर्शवली होती. तद्नंतर तहसीलदार यांनी आदिवासी आश्रमशाळा कुऱ्हा येथे पाहणी करून तेथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता दिली असुन लवकरच कोविड सेंटर सुरू होता आहे.  

त्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी स्व खर्चातून 30 बेड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अजून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. कुऱ्हा परिसरातील दानशूर व्यक्तींनी आपल्याला शक्य ती मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी कुऱ्हा येथे आज सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक यांची कोविड आयसोलेशन सेंटर च्या नियोजनासाठी तहसीलदार श्वेता संचेती यांच्या प्रमुख उपस्थिती खाली जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि प सदस्य निलेश पाटील,सरपंच मानकर, जेष्ठ कार्यकर्ते पुरणमल चौधरी, डॉ बि सी महाजन, उपसरपंच पुंडलिक कपले,पो पा विजय पाटील,संजय पाटील, प्रदिप साळुंखे विशाल महाराज खोले, दशरथ कांडेलकर,रमेश खंडेलवाल,राजुभाऊ माळी, ओमप्रकाश चौधरी, रणजित गोयनका, नवनीत पाटील,सुनील काटे, विजय सोनार,शिवराज पाटील,डॉ मनिष अग्रवाल, डॉ तिलोक चव्हाण, डॉ विनोद पाटील, डॉ ब्रिजेश अग्रवाल, डॉ तुषार बाठे, डॉ उदय उगले, डॉ एस एम ,बि डी कुलकर्णी, प्रल्हाद बढे, गजानन पाटील, दशरथ फालक, दिपक सोनी, प्रदिप पुरी गोसावी, अनंत पाटील, संतोष पाटील, नागेश महाजन, रामेश्वर येरूकर, संतोष पाटील,अक्षय गव्हाले,धनराज कांडेलकर,संतोष कांडेलकर,प्रसाद जैन, देविदास पाटील,राजेश ढोले, मुन्ना बोडे, मयुर साठे , सुशील भुते, यांच्या उपस्थिती मध्ये बैठक पार पडली. 

यावेळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, डॉक्टर सर्वांनी यथाशक्ती मदत जाहीर केली. यामुळे परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार असुन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना कुऱ्हा येथे आयसोलेटेट होऊन उपचार उपलब्ध होतील.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.