बापरे… कासोदा दरवाजा भागात दिसले भुयार

एरंडोल प्रतिनिधी । येथे कासोदा दरवाजा भागात रामभाऊ गांगुर्डे यांचे घराचे नव्या आर.सी.सी बांधकामासाठी कॉलम खोदत असताना जवळपास दहा फूट खोल व अडीच ते तीन फुट व्यासाचे अचानक भुयार दिसले. ही घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर गावात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, दगड व माती टाकून ते पुरण्यात आले. एरंडोल हे ऐतिहासिक व प्राचिन शहर असून येथे भुयार पडल्याच्या घटना अनेकवेळा आढळून आल्या आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठविण्यासाठी धान्याची कोठारे असावित असा अंदाज जुन्या जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.दरम्यान भुयार पडल्याची वार्ता परीसरात पसरताच घटनास्थळी भूयार पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.