मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्राचा हिस्सा म्हणून आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून आगाऊ रक्कम म्हणून १४ पूरग्रस्त राज्यांना ५८५८.६० कोटी रुपये जारी केले आहेत. त्यातील सर्वाधिक निधी महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये दिले आहेत. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या राज्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, मोदी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सरकारने म्हटले आहे.
आंध्र प्रदेशला १०३६ कोटी रुपये, आसामला ७१६ कोटी रुपये, बिहारला ६५५५.६० कोटी रुपये, गुजरातला ६०० कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला १८९.२० कोटी रुपये, केरळला १४५ कोटी रुपये, मणिपूरला ५० कोटी रुपये, मिझोरामला २१.६० कोटी रुपये, नागालँडला १९.२० कोटी रुपये, सिक्कीमला २३.६० कोटी रुपये, तेलंगणाला ४१६.८० कोटी रुपये, त्रिपुराला २५ कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला ४६८ कोटी रुपये निधी जारी केले आहेत. या वर्षी अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे ही राज्ये प्रभावित झाली आहेत.