राज्यातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्राने दिली मान्यता !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आहेत. मान्यता दिलेल्या बहुतेक महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत तसेच इमारतीपासून हॉस्टिल सुविधा नसतानाही याबाबतच्या अटी पूर्ण करण्याच्या हमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.

राज्यसरकारने यंदाच्या वर्षी मुंबई व नाशिक येथे ५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आता नव्याने केंद्रसरकारने आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे राज्यात आता एकूण ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची एकूण प्रवेश क्षमता ५०५० एवढी असून नव्याने जागा वाढल्याने ती ५८५० एवढी होणार आहे.

अंबरनाथ,गडचिरोली,वाशीम, जालना, बुलढाणा,हिंगोली व भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १०० प्रवेश क्षमतेसाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या तपासणीत या महाविद्यालयांमध्ये पुरसे अध्यापक तसेच इमारतीसह आवश्यक सुविधा नसल्यामुळे मान्यता नाकारण्यात आली होती. मात्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अटींची पूर्तता करण्याच्या हमीवर या आठ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये आर्थिकदृट्या मागासांना कोटा निश्चित केल्यानंतर राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९५० जागांची भर पडली होती.

Protected Content