फैजपूर येथे न.पा. विद्यालयात गणवेश वाटप अन सत्कार समारंभ

faijpur news

फैजपूर, प्रतिनिधी | येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार तसेच शालेय गणवेश वाटप कार्यक्रम नुकताच शिक्षक दिनी म्युनिसिपल हायस्कूल येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन महाराज होते. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, शिक्षण समिती सभापती सौ.शकुंतला भारंबे, शालेय समिती अध्यक्ष शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलीम खां मण्यार, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेविका सौ. अमिता चौधरी, नगरसेविका श्रीमती वत्सला कुंभार, सामाजिक कार्यकर्ते मलक आबीद आदी उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेश वाटप तसेच श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था यांच्याकडून गरजु व निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक दिनानिमित्त जनार्दन महाराज यांनी मनोगत व्यक्त करून या शाळेतील शिक्षकांनी अनेक यशस्वी व्यक्तींना घडवले आहे. त्यामुळे ऐतिहासीक वारसा असलेली ही शाळा टिकली पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे, असे बोलून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी नेवे प्रतीक्षा योगेश हिचा व तिच्या पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शाळेचे सांस्कृतिक प्रमुख बी.डी. महाले यांनी ‘भगवान बुद्ध व त्यांचा धम्म’ हा ग्रंथ जनार्दन महाराज यांना भेट दिला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक आर.एल. आगळे व पर्यवेक्षक एस.ओ. सराफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक एस.के. महाजन यांनी व सूत्रसंचालन बी.डी. महाले यांनी केले तर आभार श्रीमती नीलिमा खडके यांनी मानले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.

Protected Content