अतिक्रमण भोवले, सरपंच व उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य अपात्र

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रायपूर येथील सरपंच, उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण पाच जणांना अतिक्रमण भोवले असून त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र घोषीत केले आहे.

ससविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या संदर्भातील वृत्त असे की, रायपूर (ता. रावेर ) येथील सरपंच रूपेश युवराज पाटील, उपसरपंच तुकाराम सखाराम तायडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखाबाई तायडे, सौ. माधुरी चौधरी आणि प्रकाश भिकारी तायडे यांनी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्याची तक्रार रायपूर येथील मनोहर लक्ष्मण पाटील यांनी केली होती. त्यांना ग्रामसेवकांनी मदत केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीच्या नंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९च्या कलम १४ (१) (ज-३) अन्वये या पाचही जणांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. हा निर्णय १९ जुलै रोजी पारीत करण्यात आलेला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: