ब्रेकींग : कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट भारतात दाखल !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | ओमायक्रॉन हा कोरोनाचा अतिशय घातक व्हेरियंट भारतात दाखल झाला असून कर्नाटकात याचे दोन रूग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ६६ वर्षीय आणि ४६ वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.  कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण ११ तारखेला तर दुसरा २० नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा ६४ वर्षाच आहे तर दुसरा रुग्ण हा ४४ वर्षांचा आहे.  काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Protected Content