भुसावळातील प्रौढाची सोशल मीडियात बदनामी करून १० हजाराची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला अनोखळी व्यक्तीने मोबाईलचा डाटा चोरला. मोबाईल मध्ये असलेल्या महिलांच्या नंबर अश्लिल मजकूरच्या मदतीने सोशल मीडियात व्हायरल करून १० हजार रूपयांची खंडणी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार २१ जुलै रेाजी सायंकाळी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात ४० वर्षीय प्रौढ व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने मॅसेज केला व १० हजाराची खंडणीची मागणी केली. दरम्यान प्रौढाने पैशांची पुर्तता न केल्याने समोरील अनोळखी व्यक्तीने प्रौढाच्या मोबाईलचा डाटा चोरून त्यात महिलांचे मोबाईल क्रमांकासोबत अश्लील भाषा वापरली आणि सोशल मीडियात व्हारयल करून दिले. त्यामुळे त्यांची बदनामी करून १० हजाराची मागणी करत आहे. दरम्यान प्रौढ व्यक्तीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले करीत आहे.

Protected Content