गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रम

ratilal

एंरडोल प्रतिनिधी । येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका व दिवसभर शिक्षकांचे कामे केली. शिक्षक दिनाचे महत्त्व वेदांत जोशी, माझीन शेख, मृण्मयी सुर्वे, मारूफ पटेल यांनी पटवून दिले. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाने माणूस घडतो हे नाट्य सादर केले. तसेच प्राध्यापक पी.डी. पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, संस्कार हे घरातूनच दिले पाहिजे, तसेच भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचे फार मोठी मोलाची भूमिका असते. व शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, प्राध्यापक पी.डी. पाटील व वडगावकर मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रुपाली तेलंगे, संदीप सर, हिना सय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहित महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन उमर पटेल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

Protected Content