एरंडोल येथे महामार्गावर आयशर कलंडला; जिवीतहानी नाही

एरंडोल प्रतिनिधी । धुळ्याकडून जळगावकडे जाणाऱ्या आयशर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील पुलावर गाडी कलंडली. यात कोणतीही जीवीतहानी झाली नसून सुमारे दोन तास वाहतूक थप्प झाली होती.

याबाबत माहिती अशी की, धुळ्याहून जळगावकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून आयशर क्रमांक (एमएच ०४ एफडी ७३१७) एरंडोलपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिवानंद जवळील पुलावर आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कलंडून पुलावरच आडवा झाला होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक पुर्णपणे थप्प झाली होती.

एरंडोल पोलीस ठाण्यातील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली होती. आज एरंडोल येथील आठवडे बाजार असल्याने शहराजवळील काही गावातील ग्रामस्थांची वाहतूक खोळंबल्यामुळे घरी जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. क्रेनच्या मदतीने महामार्गावरील ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

Protected Content