विहिरीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मोर धरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरातील शेती शिवारात असलेल्या गट नंबर १२०३ या शेत मजूर काम करण्यासाठी गेले असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यामुळे शेतात काम करणार्‍या साठी आलेल्या मजुरांनी तात्काळ शेतमालकाला कळविले व शेतमालकाने सदर हिंगोणा गावातील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना फोन द्वारे माहिती दिली.

यानंतर हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली व सदरच्या घटनेची माहीती फैजपूर पोलीस ठाण्यात दिली. ही माहिती मिळताच फैजपूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले.

सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी महिलेच्या असून महिलेची ओळख पटू शकली नाही. महिलेचे वय अंदाजे ४४ वर्ष असुन तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे. फैजपूर पोलीसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देविदास सूरदास हे पुढील तपास करीत आहेत.

Protected Content