ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्‍हाळे कालवश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टिव्ही नाईन वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल केर्‍हाळे यांचे आज पहाटे उपचार सुरू असतांना निधन झाले.

टिव्ही नाईन मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्‍हाळे यांचे आज पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास निधन झाले. अतिशय दुर्धर अशा व्याधीतून ते बरे झाले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना त्यांनी पहाटे शेवटचा श्‍वास घेतला.

अनिल केर्‍हाळे यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अतिशय चमकदार कामगिरी बजावली होती. वृत्तवाहिनींमधील जिल्ह्यातील आघाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनिल केर्‍हाळे यांच्या अकाली मृत्यूमुळे पत्रकारितेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव आज जळगावात येणार असून येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content