अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने बुलेटला दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना तालुक्यातील घोडसगाव येथे घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, काल रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील उड्डाण पुलाजवळ भीषण अपघात घडला. यात अज्ञात वाहनाने एमएच १९ सीएस ६९६८ क्रमांकाच्या बुलेट दुचाकीला जोरदार धडक दिली. यात यावर स्वार असलेला पृथ्वीराज चव्हाण आणि सागर गोपाळ हे दोन तरूण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दोन्ही तरूणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या संदर्भात चरणसिंग सावजी चव्हाण ( रा. कापूसवाडी, ता. जामनेर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाकाली पो. ना. विजय पढार हे करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content