बोदवडच्या हिदायतनगरातील कॉंक्रीटीकरणाचे दोन वर्षात वाजले बारा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील हिदायत नगरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाची दोन वर्षात अक्षरश: दयनीय अवस्था झाली असून याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड येथील हा एरिया पूर्ण अल्पसंख्यांक समाजाचा आहे. दिनांक ८/११/ २०१९ रोजी रस्ता कॉंक्रीटकरण करण्यासाठी एकूण ४५ लाख २२ हजार १६१ रुपयाची निविदा मंजूर करण्यात आलेली होती. ती निविदा एचएमटी एजन्सी राहणार भुसावळ या नावाने मंजूर झालेली होती. एचएमटी एजन्सी यांनी दोन टक्के रक्कम अनामत ९०४४४/ भरून हे काम घेतले होते. यानंतर तेच काम बोदवड येथील एकाने ठेक्याच्या पद्धतीने घेतले होते. दरम्यान, संबंधीत एजन्सीने ते काम सहा महिन्याच्या मुदतीत करावे असे मुख्याधिकारी यांनी त्यांना पत्र १९/९/२०१९ रोजी दिले होते.

त्यावेळी नंदलाल पठे यांनी निकृष्ट पध्दतीत होत असलेल्या सिमेंट कॉंक्रेट रस्त्याला विरोध केला होता. कारण ते नोट फॉर सेलचे सिमेंट वापरत होते. ज्यावेळेस विरोध केला; त्यावेळेस त्यांनी ते काम थांबवले.परंतु रातोरात काम केल्यामुळे आज त्या रस्त्याची हालत बिकट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. आज चिखल झाल्यामुळे तेथून लोकांना जाता येत नाही.त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून रिकव्हरी करून हा रस्ता परत त्याच निधीतून करण्यात यावा.अशी मागणी बोदवडकरांकडून केली जात आहे.

Protected Content