शेंदूर्णी फळविक्री संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ.किरण सूर्यवंशी

शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शेंदुर्णी फळविक्री संस्थेच्या उपाध्यक्षपदी आज डॉ. किरण सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील शेंदूर्णी सहकारी फळविक्री संस्था मर्या.शेंदूर्णी या संस्थेच्या उपाध्यक्ष निवडीसाठी आज दिनांक ९ रोजी सकाळी ११ वाजता सहकार अधिकारी एस.एस.पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संस्थेच्या उपाध्यक्ष पदासाठी माजी पंचायत समिती सदस्य व संस्थेचे संचालक डॉ.किरण दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या नावाची सूचना संस्थेचे अध्यक्ष संजय भास्करराव गरूड यांनी मांडली.

त्यास  डॉ.दिवाकर रायाजी पाटील यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. संस्थेचे नव निर्वाचित उपाध्यक्ष डॉ. किरण सूर्यवंशी यांचा अध्यक्ष संजय गरूड व अन्य संचालकांनी सत्कार केला यावेळी सहकार अधिकारी एस.एस.पवार यांचाही संस्थेचे वतीने संजय गरूड यांनी सत्कार केला.

बैठकीला संस्थेचे संचालक दिनेश पाटील,डॉ.दिवाकर पाटील ,रघुनाथ माळी, विनोद पाटील,देविदास महाजन, प्रदीप धनगर, भरत बारी, महेंद्र चौधरी, नारायण चांभार,सौ.संध्या पाटील, सौ.जयश्री गरूड यांची उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रियेत सहकार अधिकारी यांना संस्थेचे मॅनेजर रविंद्र पाटील, रोखपाल प्रभाकर पाटील, लिपिक ईश्वर तागवाले,सेवक विनोद तडवी,विश्वनाथ गुजर यांनी मदत केली.

Protected Content