तिहेरी अपघातात तरूणाचा मृत्यू : एक अत्यवस्थ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे झालेल्या तिहेरी अपघातामध्ये तरूणाचा मृत्यू झाला असून एक जणाची प्रकृती चिंताजनक आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे काल रात्री दोन दुचाकी आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. यात पिंपळगाव गोलाईत येथील तरूण सुशांत सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय पाटील हा पाळधी येथील तरूण अत्यवस्थ आहे. तर अपघातातील शेख अर्शद शेख हरूण, समीर शेख जाकीर व अजय पाटील हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जळगावला हलवले आहे. यातील तालुक्यातील पाळधी येथील अजय पाटील या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. यातील जखमींवर जळगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content