नायगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीस स्थानकात एका सतरा वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात अपहृत झालेल्या मुलीच्या आईने फिर्याद दिलेली आहे. या फिर्यादीनुसार, नायगाव येथे संबंधीत मुलीचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारी भुषण आत्माराम कोळी यास व त्याचे कुटुंबीयांना ओळखते. तो या कुटुंबातील दहावीत शिकत असलेल्या मुलीला नेहमी त्रास देत असे. यावरून दोन्ही कुटुंबात वाद देखील झाले असले तरी बदनामी होऊ नये म्हणून पोलीसात तक्रार देण्यात आली नव्हती.

दरम्यान, दि २६/०४/२०२२ रोजी रात्री सर्व कुटुंब झोपले होते. यानंतर, सकाळी उठल्यानंतर ती तरूणी घरात नसल्याचे दिसून आले. आपल्या मुलीस भुषण आत्माराम कोळी ( रा. नायगाव ता यावल ) यानेच अपहरण करुन घेवुन गेला असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अनुषंगाने यावल पोलीस स्थानकात भूषण आत्माराम कोळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: