वन परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना हृद्य निरोप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पूर्व विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांची बदली झाल्यानिमित्त त्यांना वन खात्यातर्फे हृद्य निरोप देण्यात आला.

यावल येथील पुर्व वनविभागा च्या कार्यालयातील सभागृहात आयोजीत  वन विभागात कार्यरत असलेले पुर्व विभागाचे वनपरिश्रेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांची चोपडा आणी यावल या विभागात मागील आठ वर्षाच्या सेवाकार्या नंतर शिंदखेडा जिल्हा धुळे येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन यावल पुर्व विभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे, चोपडा विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील ,वन विभागाचे जेष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी वाय. डी. पाटील यांच्यासह पुर्व आणी पश्चिम विभागाचे वनपाल वन कर्मचारी हे मोठया संख्येत उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वनपरिश्रेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या यावल क्षेत्रातील कर्तव्यावर असतांना आपल्या कार्यकाळात वनविभागाशी निगडीत विविध गंभीर विषयांवर त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे व कार्य करण्याच्या कौशल्याचे विशेष कौत्तुक उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे व आदी उपस्थितांनी केले.

दरम्यान, विक्रम पदमोर आपल्या सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, ”ज्या प्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सिमारेषेवर आपले जिव धोक्यात घालुन आपले सर्वांचे रक्षण करतात त्याचप्रमाणे आपण देखील जिव ओतुन आपल्या निर्सगाचे व वनजमिनीचे वन प्राण्यांचे रक्षण करावे हेच ध्येयधोरण ठेवुन आपण सेवा करावी. वनविभागात प्रशासकीय सेवा करतांना संयमाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन कार्यकेल्यास आपल्याला नाव लौकिक मिळवणारी उत्कृष्ठ अशी प्रशासकीय सेवा आपणास करता येईल. मी आज यावल सारख्याने अंत्यत अतिसंवेदनशिल म्हणुन ओळख असलेल्या वन विभागात जे काही प्रशासकीय सेवेत चांगले कार्य करू शकलो ते फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच शक्य झाले !” असे प्रतिपादन  विक्रम पदमोर यांनी व्यक्त केले.

या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार वन कर्मचारी सुपडु सपकाळे यांनी मानले .

Protected Content