शेलवड विद्यालयात शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा विसर

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ब.मा.विद्यालय शेलवड येथे साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी न केल्यामुळे हायस्कूल मुख्याध्यापक कर्मचारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

बोदवड तालुक्यातील शासन परिपत्रकानुसार विविध ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली; पण शेलवड शाळेत भेट दिली असता त्या ठिकाणी एक कर्मचारी आढळून आले. त्यांना जयंती निमित्त विचारले असता अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली नसल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये थोर स्त्री – पुरुषांची ओळख व्हावी. त्यांच्या विचाराने चांगले संस्कार व्हावेत. या अनुषंगानं त्यांची जयंती ही प्रार्थनाच्या वेळेस किंवा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करून साजरी केली जाते. संबंधित शाळेशी संपर्क केला असता त्यांनी जयंती साजरी न केल्याचे दिसून आले. याबाबत मुख्याध्यापक श्री इंगळे सर यांना फोनवरून विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असलेले एक शिक्षक यांच्याशी चर्चा केली असता मी शिक्षक कर्मचारी असून शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न केल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात. याकडे तालुक्याचे मागासवर्गीयांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content