Home Cities जळगाव जयदीप रडे यांना अमेरिकेतील आयवा स्टेट युनिव्हर्सिटीकडून पीएच.डी पदवी प्रदान

जयदीप रडे यांना अमेरिकेतील आयवा स्टेट युनिव्हर्सिटीकडून पीएच.डी पदवी प्रदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तरुण आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर जागतिक स्तरावर यशाची नवी शिखरे गाठत असून त्यात आता आणखी एका यशस्वी नावाची भर पडली आहे. जळगावातील परिचित व्यक्तिमत्त्व रवी दादा रडे यांचे सुपुत्र जयदीप रडे यांना अमेरिकेतील नामांकित Iowa State University कडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जळगाव जिल्ह्याचा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमेरिकेत नुकताच पार पडलेल्या दीक्षांत समारंभात जयदीप रडे यांना ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एआय’ या अत्याधुनिक आणि आव्हानात्मक विषयातील संशोधनासाठी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधन भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात एआय आधारित संशोधनाला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले असून जयदीप यांनी या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

जयदीप रडे यांनी अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण पूर्ण केले. जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या United States मधील Iowa State University मधून पीएच.डी. पदवी संपादन करणे ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही परदेशात उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जयदीप रडे हे सध्या GE Vernova येथे रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात ते काम करत असून त्यांच्या संशोधनाचा फायदा भविष्यात ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुलाने सात समुद्रापार मिळवलेल्या या यशामुळे जळगावातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले वडील रवी दादा रडे यांचे नावही अभिमानाने घेतले जात आहे. जयदीप यांच्या यशामागे पालकांचे संस्कार, प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण पाठबळ महत्त्वाचे ठरल्याची चर्चा आहे. त्यांच्या मातोश्री सौ. दीपाली रविंद्र रडे यांच्यासह संपूर्ण रडे परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound