जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी खेडगाव येथून शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अटक केली आहे त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष ममराज राठोड (वय-४०) रा.खेडगाव ता.एरंडोल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधी कॉलनी परिसरात राहणारे रवि वासुदेव कुकरेजा यांची दुचाकी (एमएच १९ डीसी ८८२४) हे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही दुचाकी संशयित आरोपी सुभाष ममराज राठोड याने चोरून नेल्याचे समोर आले होते.
त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथक तयार करून मोबाईल शोध पथकाला रवाना केले. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. छगन तायडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी सुभाष राठोड याला शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खेडगाव गावातून अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले दुचाकी देखील हस्तगत केली आहे.