धक्कादायक ! शाळेच्या छतावर आढळली चार नवजात अर्भक

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला शहरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेत आज सकाळी चार नवजात अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून 4 ते 5 महिन्याची ही अर्भकं आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अकोला शहरातील रतनलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या मैदानात मुलं क्रिकेट खेळ असताना त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला. चेंडू काढण्यासाठी छतावर गेलेल्या मुलांना हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भकं आढळून आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. हे अर्भके शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आली आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उर्दू माध्यमिक शालेयच्या शाळेच्या टेरेसवर हे अर्भकं आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे चार ते पाच महिन्यांची हे अर्भके असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्भक कुटून आले, ते कुणी टाकले यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज देखील तपासण्यात येणार आहे.

Protected Content