अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

apghar news

जळगाव प्रतिनिधी । हातेड येथे बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला तरूण जळगाव येथे दुचाकीने घरी येत असतांना ममुराबादजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात जखमी झालेला तरूणाचा किनगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोर शिवाजी ठाकूर (वय-34) रा. कोळी पेठ, राम मंदीराजवळ जळगाव हे चोपडा तालुक्यातील हातेड येथील सेन्ट्रल बँकेत शिपाई म्हणून गेल्या पाच वर्षांपासून आहे. हातेड येथेच सिंगल रूम करून ते राहत होते. बँकेला सुट्टी असली तर ते दुचाकीने ममुराबाद मार्गे घरी येत असत. शनिवारी सायंकाळी 6 वाजता दुचाकी क्रमांक एमएच 19 सीएस 8962 ने जळगाव येथे येण्यासाठी निघाले. तसेच मी येत आहे असे पत्नी सपना फोन करून सांगितले होते. ममुराबाद ते विदगाव रस्त्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. याच वाटेने महामंडळाच्या बसचालक 8 वाजेच्या सुमारास बस घेवून जात जखमी अवस्थेत पडलेले किशोर ठाकूर यांच्या नजरेस पडले. बसचालकाने क्षणाचाही विलंब न करतात जखमीस बसमध्ये टाकून किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर बसचालकानेच किशोरच्या नातेवाईकांना मोबाईलवरून घडलेली घटनेची माहिती दिली. किनगाव येथील वैद्यकिय अधिकारी यांनी किशोर यास मयत घोषीत केले.

नातेवाईकांना फोडला हंबरडा
किशोर हा एकुलता एक मुलगा असल्याने आई विमल ठाकूर, आणि वडील शिवाजी ठाकूर यांनी मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला होता. मयताच्या पश्चात दोन बहिणी, आई, वडील, पत्नी आणि अडीच वर्षाची मुलगी सिध्दी आणि पाच वर्षांचा सोहम असा परीवार आहे.

Protected Content