सातोद येथे रंगमंच अन प्रवेशव्दाराचे काम शासकीय निधीतूनच झाल्याचा निर्वाळा (व्हिडीओ)

satod rangmanch

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सातोद येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खुल्या रंगमंचाचे काम न करता सुमारे पाच लाख रुपयांचा शासकीय निधी परस्पर लाटल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील व अन्य दोन सदस्यांनी गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे केली आहे. मात्र या तक्रारीचे खंडन तेथील ग्रामस्थांनी केले आहे.

 

याबाबत वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने ललीत पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’शी बोलतांना सांगीतले की, आमच्या गावात खुले रंगमंच व्हावे म्हणुन आम्ही २०१६-१७ या कार्यकाळात जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातुन मिळालेल्या निधीतुन सदरचे रंगमंचचे काम मंदिराच्या परिसरात पूर्ण केल्याचे दिसुन येत आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल गोविंदा पाटील यांनी सातोद गावाला प्रवेशव्दार हे नव्यानेच बांधले गेले असुन तांत्रीकदृष्टया तसे संबंधीत तक्रारकर्त्यांना वाटत असेल तो भाग वेगळा असुन आज त्या ठिकाणी प्रवेशव्दार प्रत्यक्षात बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे निधीचा उपयोग झाला नाही, हे म्हणणे साफ चुकीचे आहे. असे पाटील यांनी सांगुन गावाच्या विकासासाठी आपण कधी राजकारण करीत नसल्याचे सांगुन आपण सर्वांना सोबत व विश्चासात घेवुन स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका या बिनविरोध केल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल गोविंदा पाटील, ललीत पाटील, हिरामण साबळे, अरूण महाजन, हर्षल सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य योगराज तळेले, प्रेमचंद भारंबे, अनिल ढाके, राजु भारंबे, लिलाधर मिस्त्री, मा.ग्रा.प. सदस्य पंकज पाटील, खुशाल तळेले, रंजन तळेले यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Protected Content