जिल्हास्तरीय शालेय आट्या-पाट्या स्पर्धेत अंतीम सामन्यात किनगावचा संघ विजयी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हास्तरीय शालेय आट्या-पाट्या स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात घेण्यात आले.  या स्पर्धेत इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथील १४ वर्षाआतील वयोगटतील किनगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरसोली येथील संघाला १ गुणाने तर अंतीम सामन्यात अमळनेरच्या संघाचा १४ गुणांनी पराभव करत विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेत आपले स्थान मिळवले.

 

या खेळाडुंना क्रीडा शिक्षक व यावल तालुका क्रीडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन जिल्हाआधिकारी आयुष प्रसाद पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, ह.भ.प.जळकेकर महाराज, जिल्हा क्रिडाअधिकारी रवि नाईक तालुका क्रिडा अधिकारी गुरूदत्त चाैहान, जगदिश चाैधरी,सुजाता घुलाने मॅडम व अट्यापाट्या संघटनेचे अनिल माकडे यांची उपस्थीती लाभली.

 

या मान्यंवरांनी सर्व खेळाडुंचे कौतुक केले तर इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचेचेअरमन विजय कुमार देवचंद पाटील,व्हा.चेअरमन शैलेजा विजयकुमार पाटील सचिव मनिष विजकुमार पाटील व्यवस्थापक .पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उप प्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विजयी खेळाडुंचे अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Protected Content