पाय घसरून विहिरीत पडल्याने तरूणीचा मृत्यू


Crime

जळगाव प्रतिनिधी । शेतात बकऱ्या चारतांना पाय घसरून विहिरीत पडल्याने 16 वर्षीय तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अडावद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, भारती गुमान बारेला वय 16 रा. पारगाव ता.चोपडा ही तरूणी बकऱ्या चारण्याचे काम करते. आज सकाळी 8 वाजता घरून बकऱ्या चारण्यासाठी पारगाव शेत शिवारात गेली. चारता चारता एका शेतातील कोरड्या विहिरीजवळ आल्याने तिचा पाय घसरून विहिरीत पडली. विहिरीत पडल्याचे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात आल्याने खाटीच्या सहाय्याने तिला विहिरीतून काढले. उपचारासाठी तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यापुर्वी विदगावजवळ तरूणीचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अडावद पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here