उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या यावलच्या दोन पोलीसांचा झाला सन्मान

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा गुन्हे शोधकामी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ बी जी शेखर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला आहे .

यावल तालुक्यातील किनगाव गावात मागील वर्षी अनैतिक संबधातुन भिमराव सोनवणे नावाच्या व्यक्तिचा निर्दयीपणे खुन करण्यात आला होता, या अत्यंत गुंतागुतीच्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी यावल पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलिस शिपाई शामकांत धनगर यांनी योग्य दिशेने तपास करीत गुन्ह्यातील  आरोपीस शिताफीने अटक केली होती , उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बि. जी. शेखर यांच्या हस्ते जळगाव येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले.

जळगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित , एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होते .फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक विनोदकुमार गोसावी , पोलिस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके यांच्यासह आदींनी सन्मानपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे अभीनंदन केले.

Protected Content