यावल वन्यजीव अभयारण्यात ग्रामस्थ व पर्यटकांना प्रवेश बंदी

जळगाव (वृत्तसंस्था) ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्यासह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर- मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य (धुळे) यामध्ये 31 मार्च, 2020 पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, असे नाशिकच्या वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाची अधिसूचना आणि जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’ विषाणू (COVID 19) ही जागतिक साथ घोषित केल्याचे लक्षात घेवून या विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच या विभागांतर्गत येणारी वरील अभयारण्ये क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थ व पर्यटकांची सुरक्षा व आरोग्याच्यादृष्टिने वरील अभयारण्ये 31 मार्च 2020 पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहतील.  याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या वन परिक्षेत्रातील परिमंडळ, नियत क्षेत्रामध्ये संबंधित कर्मचारी उपस्थित राहतील. ते या अभयारण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश बंद करतील, असेही वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी म्हटले आहे.

Protected Content