टेम्पोमधून दोन लाख लंपास : दोन चोरटे अटकेत ; दोन फरार

भडगाव प्रतिनिधी । पाचोरा रोडजवळील आयटीआय जवळ टेम्पोमधून २ लाख ६ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी भडगाव पोलीसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य दोन संशयित फरार आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दिनाक ११ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भडगाव हुन पाचोराकडे जात असताना भडगाव येथे पाचोरा रस्तालगत शासकीय आयटीआय जवळ व्यापारी भिकन आंनदा पाटील रा. सातगाव डोंगरी ता. पाचोरा यांच्या टेम्पोचे टायर पंचर झाले होते. टायर बदलवत असताना भडगाव कडुन आलेले अनओळखी ३ इसमांनी टायर बदलविण्यास मदत करतो असे सांगुन टायर बदल करत असताना तीन इसम पैकी एकाने गाडीच्या कॕबिन मध्ये ठेवलेली २ लाख ६ हजार ६०० रुपयाची पिशवी लांबविली होती. या चोरी प्रकरणी भडगाव पोस्टेला अज्ञात व्यक्ती विरुध्द व्यापारी भिकन आंनदा पाटील यांच्या फीर्यादी वरुन गुन्हा दखल करण्यात आला होता.

या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे करत असताना दरम्यान टेम्पोचा चालक विशाल संजय तेली याच्या हलचाली संशयास्पद जाणवल्या. यावरुन त्याच्यावर पाळत ठेवुन त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला असता या घटनेत चालक सह अन्य तीन असा एकुण चार आरोपीचा सहभाग आढळुन आला. मिळालेल्या माहितीच्या आधारावर टेम्पो चालक विशाल संजय तेली व सागर संजय पाटील दोघे रा. पिपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा यांना दोघाना अटक करण्यात आली. अन्य दोन संशयित फरार आहेत. पोलीस त्याच्या शोध घेत आहे. पोलीस ताब्यात असलेल्या दोघा संशयितानी प्रत्येकी २० हजार रुपये घेतल्याचे कबुल केले आहे.

टेम्पो चालक विशाल संजय तेली व सागर संजय पाटील दोघे रा. पिपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यांना भडगाव न्यालयात हजर केले असता १ जुन पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे करीत आहे.

 

 

Protected Content