रावेरकरांना वादळी पावसाचा फटका; केळीबाग उद्ध्वस्त

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाल, गुलाबवाडी परिसरात आज वादळी पावसाच्या तडाख्यामुळे शेती शिवारातील केळीबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर अनेकांच्या घराचे पत्रे उडाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. एका आठवड्यात तिसऱ्यांदा वादळी तडाखा रावेरकरांना बसला आहे. 

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सातपुडा पर्वत भागातील पाल व गुलाबवाडी शिवारात झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ऐन कापणीवरील आलेल्या केळीबागा व बरीचशी झाडे उन्मळून पडली . यामुळे केळी पीक जमिन दोस्त होऊन वेळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . रावेर तालुक्यातील पाल परीसरातील आज वादळी पावसामुळे काही प्रमाणात केळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाल व गुलाबवाडी येथील काही गट नंबर मधील केळीचे नुकसान झाले आहे. तसेच काही शेतात कापणी वरील असलेल्या मुंग या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . तर या वादळी पावसामुळे या दोन्ही गावातील अनेक घरांचे पत्रे, कौलारू छपरे उडून अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले . विट भट्यांचेही नुकसान झाले आहे . वीज खांब व वीज तारा पडून वीज पुरवठा खंडीत झाला आहे

 

 

Protected Content