जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ममता हॉस्पिटल समोर दुचाकी ने जात असलेल्या एका तरुणाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या जोरदार धडक दिली. या धडके 26 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 2 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता ममता हॉस्पिटल समोर घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अरबाज खालील शेख (वय 26 रा. मास्टर कॉलनी जळगाव) हा तरुण 2 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच 19 एडब्ल्यू 9040) जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरांमधून जात असताना समोरून येणारी दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या तारखेला दुचाकीस्वार अरबाज खलील शेख हा जखमी झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर धडक देणारा दुचाकीस्वार अक्रम अल्ताफ मेमन रा. गणेशपुरी जळगाव हा दुचाकी घेऊन पसार झाला आहे दरम्यान या संदर्भात जखमी अरबाज याचा भाऊ अकिल खालील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी 4 जुलै रोजी मध्यरात्री 1 वाजता दुचाकी चालक अक्रम अल्ताफ मेमन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत जाधव करीत आहे.