Home Uncategorized महामार्गावर तातडीने रिफ्लेक्टर बसवा : नगरसेविका जयश्री पाटील यांची मागणी

महामार्गावर तातडीने रिफ्लेक्टर बसवा : नगरसेविका जयश्री पाटील यांची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी नॅशनल हायवेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गुरुवार, १६ एप्रिल रोजी निवेदनांद्वारे रिफ्लेक्टर व दिशा दर्शक फलक बसविण्याची मागणी केली आहे.

निवेदनांत नमूद केल्यानुसार, मानराज पार्क स्टॉप ते खोटेनगर दरम्यान असलेल्या पूल व सर्व्हिस रोडच्या कडेला वाहनं उभी राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच मानराज पार्क स्टॉप ते शिव कॉलनी स्टॉप दरम्यान रेल्वे पुलाजवळही अशीच परिस्थिती असून, येथेही तातडीने दिशा दर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, रिफ्लेक्टरच्या अभावामुळेच बुधवारी 3 एप्रिल रोजी रात्री अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी बॅरिअर्स खराब झाल्याने आणि रस्त्यावर अंधार पसरल्याने मानराज ते खोटेनगर दरम्यान एका वेगाने जाणाऱ्या कारने कडेला असलेल्या बॅरिअरला जोरदार धडक दिली. (क्रमांक एमएच-१९, सीबी-०७९२) या कारचे चालक बाजूचे काच व बॉडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद करण्यात आली नव्हती.

महामार्ग सुस्थितीत असला तरी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ रिफ्लेक्टर व इतर सुरक्षाविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

 

 


Protected Content

Play sound