धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील कवठळ गावात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या आईला शिवीगाळ करत त्याच्यावर लोखंडी कोयत्याने वार करून दुखापत केल्याची घटना 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडले आहे. यासंदर्भात शुक्रवारी 4 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कवठळ गावात स्वप्निल सारिका खरे वय 24 रा. कुसुंबा ता. जि. जळगाव हा तरुण वास्तव्याला आहे. दरम्यान 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता गावात तो त्याच्या घरी कवठळ येथे आलेला असताना जुन्या वादात पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून नवीन प्रल्हाद खरे आणि यश नवीन खरे दोन्ही रा. बांभोरी ता. धरणगाव यांनी स्वप्नील खरे आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर यातील एकाने स्वप्निलच्या पायावर लोखंडी कोयता मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या स्वप्निलला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी 4 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे नवीन प्रल्हाद खरे आणि यश नवीन खरे दोन्ही रा. बांभोरी ता.धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप खंडारे करीत आहे.