भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका लॉजमध्ये थांबलेल्या दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, मूळच्या बांगलादेशातील दोन तरूणी या कलकत्ताकडून मुंबईकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. यात त्या काल सायंकाळी शहरातील एका लॉजमध्ये थांबल्या. येथे त्यांनी ओळखपत्र म्हणून दाखविलेले आधार कार्ड हे बनावट असल्याची शक्यता संबंधीत लॉजच्या व्यवस्थापकाला वाटली. त्याने तातडीने या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्थानकाला याबाबत माहिती दिली.
या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलीस पथकाने तात्काळ या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही तरूणींना एका रॅकेटच्या माध्यमातून मुंबई येथे पाठविण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या संदर्भात बाजारपेठ पोलिस कसून तपासणी करत आहेत. तर, या दोन बांगलादेशी महिला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.