परिसरात दहशत माजविणाऱ्या दोन आरोपीना अटक; वरणगाव पोलिसांची कारवाई

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव येथे गावठी पिस्टल मॅगझीनसह दोन जिंवत व एक गॅवझीन घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २२ सप्टेंबर रोजी सब पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम सिध्दार्थ भालेराव व अनिरूध्द ठाकुर दोन्ही रा. मुक्त्ताईनगर हे अग्निशस्त्र घेवुन वरणगांव कडुन मुक्ताईनगर कडे जाणा-या रोडवर हॉटेल चाय ला चे पुढे ऑर्डनस फॅक्टरी कडे जाणा-या रोडवरील फाट्यावर दशहत माजवित आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून पोउनि रामदास गांगुर्डे, पोहेकाँ ३७ यासिन पिंजारी, पोहेकॉ २४ प्रेमचंद सपकाळे, पोकॉ ६५६ मनोज म्हस्के, पोकाँ २०१४ इश्वर तायडे नेम-वरणगांव पो स्टे अशांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे दोन इसम हे संशयीतरित्या सदर ठिकाणी दिसुन आल्याने सदर इसमावर अचानक १७.०० छापा टाकुण दोन इसमानां जागीच पकडले असता त्यांचे नावे १] सिध्दार्थ संतोष भालेराव वय २३ वर्ष २) अनिरूध्द कैलास ठाकुर वय २० वर्ष दोन्ही रा. मुक्ताईनगर असे असुन त्यांचे अंग झडतीत २५०००/-रूपये किमतीचा एक. सिल्वर रंगाचा अवैध गावठी कट्टा मॅगझीनसह ४०००/- रूपये किमतीचे दोन जिवंत काडतुस, ५०००/- रूपये किमचे गावठी कटयाचे एक मॅगझीन इतका मुद्देमाल मिळून आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि भरत चौधरी पोउनि रामदास गांगुर्डे, पोहेकॉ ३७ यासिन पिंजारी, पोहेकॉ २४ प्रेमचंद सपकाळे, पोकाँ ६५६ गनोज म्हस्के, पोकों २०१४ इश्तर तायडे, पोकाँ ९६२ भुषण माळी. पोकॉ गोपिचंद सोनवणे, पोकों सायबराव कोळी नेम-वरणगांव पो स्टे अशांनी सदरची कारवाई केली आहे.

Protected Content