नशा करणाऱ्या दोघांवर पोलीसांची कारवाई

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील गोपालपुरा येथील नदीकाठी असलेल्या झुडपाजवळ अंमली पदार्थ गांजाच्या नशा करणाऱ्या दोन जणांविरोधात मंगळवारी चाळीसगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गोपालपुर येथील तितुर नदीच्या काठी असलेल्या मोकळ्या मैदानातील झुडपा जवळ काहीजण गांजाच्या नशा करत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी रात्री ८ वाजता पथकाने कारवाई केली. या ठिकाणी संशयित आरोपी किरण राजू चौधरी वय-२५ आणि समाधान संजय चौधरी वय-२५ दोन्ही रा. चौधरीवाडा चाळीसगाव हे गांजाचे नशा करत असताना मिळून आले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण राजू चौधरी आणि समाधान संजय चौधरी रा.चौधरीवाडा चाळीसगाव या दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहे.

Protected Content