भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली, नंतर मुल नकोय म्हणून तिचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी पतीसह माहेर व सासरकडच्या मंडळींविरोधात वरणगाव पोलीसात गुनहा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की वरणगाव शहरातील साधना नगरातील २८ वर्षीय तरुणाचे लग्न अकोला जिल्ह्यातील कपाशी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत लावून दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली मुलं आत्ताच नको म्हणून तिच्या सासू-सासरे, आई-वडिलांसह पतीने तिचा गर्भपात केला. हा धक्कादायक प्रकार १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आला. सोमवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पीडित मुलीने वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिचे पती, आई-वडील, सासू-सासरे अशा ५ जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहे.