भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडकारोड परिसरातील ग्रीनपार्क भागात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेने फेसबुकवरील फ्रेंड्स रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नाही, या रागातून एकाने तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडकारोड परिसरातील ग्रीनपार्क भागात ३१ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता संशयित आरोपी अक्रम शहा (पूर्ण नाव माहित नाही) रा. भुसावळ हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ इइ ७७७) ने आला. व महिलेचा रस्ता अडून म्हणाला की, “मै तुम्हारे फेसबुक पर फ्रेंड रिक्वेस्ट भेजी है, तुम कोई जवाब देती नही, मैने मेसेज डाले है, उसकाभी जवाब तुमने दिया नही”, असे बोलून महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता संशयित आरोपी अक्रम शहा (पूर्ण नाव माहित नाही) रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहे.